शांतिब्रम्ह

संत श्री एकनाथ महाराज संस्थान, पैठण

कार्यालय :: बाहेरील नाथमंदिर , श्रीक्षेत्र पैठण , जि. औरंगाबाद . फोन :: ( ०२४३१) २२३६०२
भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- ५२०२२९३२७७१ आय. एफ. एस. सी.:- SBIN0020014
Mirror Edge
Mirror Edge
विडियो

आमच्या विषयी

पैठण! इतिहास व संस्कृतीच्या पाऊलखुणा जतन करणार टुमदार शहरात संपूर्ण विश्वाला आपल्या आचरणाने शांतीचा संदेश देणारे महान संत म्हणजे श्री एकनाथ महाराज. शांतिब्रम्ह पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, संस्कृती भाषेचे गाढे अभ्यासक अश्या अनेक गुणविशेषणासह महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आपल्या असामान्य कर्तुत्वाने व अलौकिक व्यक्तिमत्त्वाने वारकरी संप्रदायाचे अधारस्तंभ तसेच विपुल प्रमाणात ग्रंथनिर्मित्ती करून मराठी भाषेचा गौरव घडवून आणणारे श्रेष्ठ संतकवी होते. ऐश्वर्याचा परमार्थ करून परमार्थचे ऐश्वर्य दाखविणारे महान भगवदभक्त, हिंदवी स्वराज्यासाठी पोषक वातावरण बनवून गुरुभक्तीसह राष्ट्रभक्तीचे धडे देणारे थोर उपदेशक म्हणजे " शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज "

गावातील मंदिर नित्योपचार

पहाटे ५.३० वा. काकड आरती
सकाळी ६.३० वा. पुजा
सकाळी ७.३० वा. आरती
दुपारी १२.०० वा. नैवेदय
संध्याकाळी ५.३० वा. हरीपाठ
विजयी पांडुरंग चरण दर्शन व आरती
रात्री ९.३० वा. शेजारती

उत्सव वेळापत्रक

१) फाल्गुन वद्य षष्ठी, मंगळवार २६ मार्च २०१९

२) फाल्गुन वद्य सप्तमी , बुधवार २७ मार्च २०१९

३) फाल्गुन वद्य अष्टमी , गुरुवार २८ मार्च २०१९

समाधी मंदिर नित्योपचार

पहाटे ५.३० वा. काकड आरती
सकाळी ६.४५ वा. पुजा
दुपारी १२.०० वा. नैवेदय
संध्याकाळी समाधी पूजन व भागीरथी
अर्ध्या तासानंतर सायं आरती
रात्री ९.३० वा. शेजारती

रुग्णवाहिका सेवा

संस्थानातर्फे अल्पदरात भोजन व्यवस्था, विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात त्यामध्ये अनेक वर्षा पासून रुग्ण सेवेचा हा प्रकल्प अहोरात्र अत्यल्प दरात सेवा देत आहे.
संपर्क :- ९७६३१४६३५१
संपर्क :- ९८५०१३०२५९

अन्नछत्र

अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस ५००० च्या वर परगांवचे वारकरी बांधव व भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्न हे परब्रम्ह आहे ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान.. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो.

भक्तनिवास

भक्तांना निवासाची चांगली सोय उपलब्ध व्हावी म्हणून संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडलाने भाविकांसाठी अत्याधुनिक सेवासुविधा असलेले भक्तनिवास सेवा चालू आहे. तेथे २०० - ३०० खोल्यांची व्यवस्था असून, येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे.