शांतिब्रम्ह

संत श्री एकनाथ महाराज संस्थान, पैठण

कार्यालय :: बाहेरील नाथमंदिर , श्रीक्षेत्र पैठण , जि. औरंगाबाद . फोन :: ( ०२४३१) २२३६०२
भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- ५२०२२९३२७७१ आय. एफ. एस. सी.:- SBIN0020014(स्टेट बँक ऑफ इंडिया)


अन्नछत्र

अन्न हे परब्रम्ह आहे ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान... असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते.सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस ५ - ६ हजार च्या वर परगांवचे वारकरी बांधव व भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.    अन्नछत्राचे भाविक आल्यावर त्यांना संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरणाची प्रचीती येते. नाथांचा भव्य असा वाडा, टाळ व मृदुंगाने दुमदुमलेले भक्तिमाय वातावरण आणि दीपमाळ ह्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे परिसर सदैव चैतन्यमय आणि स्फूर्तीदायी असतो. संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ यांच्याद्वारे चालवणात येणार्या अन्नछत्र सेवेत येणाऱ्या भाविकांना आणि त्यांच्या वाहनांसाठी मंडळाने प्रशस्त असे अंतर्गत रस्ते आणी भव्य पार्किंग ची सोय केलेली आहे. सर्व रस्ते आधुनिक सिमेंटीकरण प्रणालीने तयार केले असून कुठल्या हि ऋतूत त्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास अथवा व्यत्यय येऊ नये ह्याची पुरेपूर दक्षता आणि काळजी घेतली आहे.महाप्रसादाचे व्यवस्थित नियोजनबध्द आणि शिस्तबध्द कार्य चालण्यासाठी व्यवस्थापन टीम नेमण्यात आले आहेत. यांच्या देखरेखी खाली हे कार्य व्यवस्थित चालते. भक्तांची महाप्रसादासाठी पंगत बसल्यानंतर त्यांना ताट ठेवणे, पाणी देणे, ताट लावणे इ. कामे करण्यासाठी सेवेकरी वर्ग कार्यरत असतो. यांच्याकरवी महाप्रसाद वाढण्याचे काम नियोजन बध्द होत असते.