शांतिब्रम्ह

संत श्री एकनाथ महाराज संस्थान, पैठण

कार्यालय :: बाहेरील नाथमंदिर , श्रीक्षेत्र पैठण , जि. औरंगाबाद . फोन :: ( ०२४३१) २२३६०२
भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- ५२०२२९३२७७१ आय. एफ. एस. सी.:- SBIN0020014(स्टेट बँक ऑफ इंडिया)


भक्तनिवास

संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे २००-३०० खोल्यांची व्यवस्था असून, येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे पैठण. कमळतीर्थ घाटाच्या सानिध्यात असलेले संत एकनाथ महाराज समाधी मंदिर.       संत एकनाथ महाराजाच्या दर्शनसाठी महाराष्ट्रातून भाविक येत असत परंतु आता देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची वर्दळ येथे सुरु झाली आहे. वर्षाला साधारणतः ०५ ते १० लाख भाविक व पर्यटक संत एकनाथ महाराजांच्या मंदिराला भेट देतात. भक्तांना निवासाची चांगली सोय उपलब्ध व्हावी म्हणून संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडलाने भाविकांसाठी अत्याधुनिक सेवासुविधा असलेले भक्तनिवास सेवा चालू आहे. या भक्तनिवासामध्ये पुरेशी परिपूर्ण स्वच्छतागृहे व स्नानगृहे आहेत. मुबलक पाणी व्यवस्था आहे. अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून सौर उर्जेचा वापर करण्यात आला आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, कॉफीची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनी भागात निसर्गरम्य असे वातावरण आहे. लाईट गेली तर जनरेटर बॅकअपची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तनिवासाचा परिसर अतिशय रमणीय व आल्हाददायक आहे. भाविकांची निवास व्यवस्था चांगली व्हावी व परिसर स्वच्छ रहावा यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवण्यात आला आहे. एकूणच संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासव्यवस्थेसाठी संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडलानी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा भक्तनिवासाची निर्मिती केली आहे. त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा.